दखल - गृहराज्यमंत्रीच गोळ्या घालण्याचं बोलतात, तेव्हा...
देशातील वातावरण बदलत चाललं आहे. आपण जबाबदारीनं वागावं, असं भाजपच्या नेत्यांना अजूनही वाटत नाही. त्यांनी ताळतंत्र सोडलं आहे. सत्तेची गुर्मी म्हणतात, ती हीच. कुणालाच जुमानायचं नाही, असं त्यांनी जणू ठरविलेलं असावं, असं सध्याचं वातावरण आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची जबाबदारी देशात कायदा व सुव्यवस्था राखण्याची असते; परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्याऐवजी तेच कायदा हातात घेण्याची भाषा बोलायला लागले, तर कसं होणार? केंद्रीय गृहराज्यमंत्रीच जर गोळ्या घालण्याची भाषा करायला लागले, तर देशात कायदा व सुव्यवस्था कशी राहणार? हंसराज अहीर यांनीच असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
लोकशाहीवर विश्वास नसणार्या डॉक्टरांनी नक्षली संघटनेत सामील व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालू, अशी जाहीर धमकीच अहीर यांनी दिली आहे. माजी पंतपˆधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमध्ये सरकारी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरचं उद्घाटन होतं; मात्र सुट्टयांच्या मोसमात डॉक्टरांनी कार्यक्रमाला दांडी मारणं पसंत केलं. त्यामुळं नाराज झालेल्या गृहराज्यमंत्र्यांनी थेट कायदा हातात घेण्याचीच भाषा केली. मी जनतेनं निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रीपदावर आहे. मी इथं येणार हे माहीत असूनही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात?, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालू, असं वादगˆस्त विधान केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केलं. खरं तर सुट्या हा डॉक्टरांचा कायदेशीर अधिकार आहे.
सुटीच्या दिवशीच्या कार्यक्रमाला डॉक्टरांना खास बोलावून घेऊनही ते आले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. डॉक्टरांना सुटीच्या दिवशी कामावर आल्याची भरपाई नंतरच्या दिवसांत देणं शक्य होतं; परंतु डॉक्टरांना नोटीस, कारवाई आदी बाबी दूरच राहिल्या, त्यांच्यावर थेट गोळ्या घालण्याची भाषा लोकशाहीचाच संदर्भ देऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री वापरत असतील, तर लोकशाहीत कुणी चुकीचं वागलं, तर त्यावर कायदा हातात घेता येत नाही, घटनात्मक मार्गानं कारवाई करावी लागते, एवढे भान कार्यकारी मंडळाचे सदस्य असलेल्या हंसराज अहीर यांना नसावं, यावर कोण विश्वास ठेवील?
ज्या वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता, त्या वाजपेयी यांनी कधीच अशी आगलावू भाषा वापरलेली नाही. त्यांना संसदीय परंपराचा कमालीचा आदर होता. कायदेमंडळ, न्याय मंडळ आणि कार्यकारी मंडळाच्या कामकाजाची विभागणी कोणत्या तत्त्वावर झाली, याची चांगलीच माहिती होती. हंसराज अहीर हे या कार्यक्रमाला येणार असतानाच रुग्णालयातील डॉक्टर रजेवर होते. रजा घेणं हा सरकारी कर्मचार्यांचा हक्क आहे. रजेचा अर्ज भरून, पुरेशी कल्पना देऊन डॉक्टरांनी रजा घेतली असेल, तर त्याबाबत अहीर यांनाही काहीच बोलता येणार नाही. डॉक्टर हजर नसल्याबद्दल त्यांना नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार जरूर आहे; परंतु नाराजी व्यक्त करताना त्यांनी बेताल विधान करून नवा वाद निर्माण केला.
दुसरीकडं केंद्रीय कौशल्य आणि विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांचं नाव त्यांच्या वादगˆस्त वक्तव्यामुळं पुन्हा चर्चेत आलं आहे.मंत्री होण्यापूर्वी याच हेगडे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आताही त्यांनी वादग्रस्त वक्तव्याची परंपरा कायम चालू ठेवली आहे. स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्ष म्हणवणार्यांना त्यांचे आई-बाप कोण हेदेखील ठाऊक नसते, असं वक्तव्य हेगडे यांनी आता केलं आहे.
या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण झाला आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यापेक्षा धर्म आणि जातीच्या आधारावरच लोकांनी स्वतःची ओळख निर्माण करावी असंही त्यांनी म्हटलं आहे. जातीअंताची भाषा एकीकडं होत असताना धर्म आणि जातींचं महत्त्त्व पुन्हा वाढविण्याचा हेतू त्यांच्या वक्तव्यामागं दिसतो. कोप्पल जिल्ह्यातील यलबुर्गा या ठिकाणी झालेल्या ब्राह्मण परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. कोणत्याही माणसानं त्याच्या धर्मापˆमाणं किंवा जातीपˆमाणे आपली ओळख मी हिंदू आहे, मुस्लीम आहे, ख्रिश्चन आहे, बˆाह्मण आहे, लिंगायत आहे अशी करून दिली, तर मला निश्चितच आनंद होईल. अशा पˆकारे ओळख करून दिल्यानं आत्मसन्मान पˆस्थापित होतो. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवाणार्या माणसांमुळंच समस्या निर्माण होतात, असाही आरोप त्यांनी केला. बुरसटलेल्या विचाराचे लोकच अशी भाषा बोलू शकतात. जात, धर्म यापेक्षा माणूस महत्त्वाचा असतो. वाजपेयी यांनी इन्सानियतला महत्त्व दिलं होतं. 21 व्या शतकातही मंत्र्यांच्या पोटातून जात, धर्म जात नाही आणि इतरांच्या चारित्र्यावर संशय घेण्याची भाषा ते बोलतात, हे नक्कीच निषेधार्ह आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हेगडे यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. अभिनेता पˆकाश राज यांनीही हेगडे यांच्या विरोधात भूमिका घेतली. एखाद्याला त्याचे आईवडील माहीत नाहीत, अशी टीका तुम्ही कशी काय करू शकता, असा पˆश्न पˆकाश राज यांनी विचारला. लोकपˆतिनिधी असूनही एखाद्याच्या पालकांविषयी इतक्या खालच्या पातळीला जाणं योग्य नाही, याची जाणीव प्रकाश राज यांनी हेगडे यांना करून दिली, हे बरं झालं. सेक्युलर लोक निधर्मी असतात, हा अनेकांचा गैरसमज आहे. इतर धर्मांचा आदर करणं, हा सेक्युलरिझमचा खरा अर्थ असतो. हेगडे यांनी राज्यघटनेतून सेक्युलर शब्दच काढून टाकण्याची भाषा केली होती. साहजिकच त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला.
भाजपच्या नेत्यांना राज्यघटना बदलायची आहे. समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यघटना बदलायला कितीही विरोध असला, तरी भाजपच्या नेत्यांच्या पोटात तेच आहे. त्यामुळं तर एका मंत्र्यानं जाहीरपणे आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी निवडून आलो आहोत, असं सांगितलं. राज्य घटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द कुठं आहे, असं काही जण विचारतात, तर काही जण इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेत दुरुस्ती करून हा शब्द घुसडविल्याचं सांगतात; परंतु राज्यघटनेचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी राज्यघटनेत पूर्वीपासूनच धर्मनिरपेक्ष असा शब्द असल्याचं निदर्शनास आणलं आहे. धर्मनिरपेक्ष लोक म्हणजे देशद्रोही नाहीत, तर ते सर्वांना समान मानणारे आहेत, सर्वधर्मियांचा आदर करणारे आहेत, हीच बाब भाजपायींच्या डोळ्यांत खुपते असून त्यांना कायदा हातात घेण्याची, राज्यघटना बदलण्याची भाषा त्यातूनच सुचते आहे.