Breaking News

सिंधुदुर्गात 17, 863 शेतकर्‍यांना 36 कोटीची कर्जमाफी

सिंधुदुर्गनगरी, दि. 13, डिसेंबर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 17 हजार 863 शेतक -यांना 35 कोटी 92 लाख 40 हजार 2 रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील 15 हजार 435 लाभार्थींना 26 कोटी 25 लाख 17 हजार 787 रुपये रकमेचा लाभ तर विविध बँकामधील 2428 लाभार्थ्यांना 9 कोटी 67 लाख 22 हजार 215 रुपये रकमेचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक मेधा वाके यांनी दिली. 


राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत थकबाकीदार शेतक-यांना त्यांचे थकीत खाते पूर्ववत करण्यासाठी व ज्या शेतक-यांनी आपले खाते नियमित ठेवले आहे. अशा शेतक-यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून मदत केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी चालू असून, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस 7 डिसेंबर रोजीपर्यंत प्राप्त झालेल्या ग्रीन लिस्टनुसार 4 हजार 18 थकबाकीदार शेतक-यांना 11 कोटी 43 लाख 15 हजार 742 इतकी रक्कम तर 11 हजार 417 शेतक-यांना प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत 14 कोटी 82 लाख 2 हजार 45 अशा एकूण 15 हजार 435 लाभार्थ्यांना 26 कोटी 25 लाख 17 हजार 787 इतक्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. 

बँक ऑफ इंडिया कर्ज माफीस पात्र लाभार्थी 746 रक्कम 3 कोटी 42 लाख 15 हजार रुपये, प्रोत्साहनपर लाभार्थी 842 रक्कम 2 कोटी 16 लाख 45 हजार, बँक ऑफ महाराष्ट्र 46 लाभार्थी रक्कम 29 लाख 28 हजार रुपये, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया 18 लाभार्थी रक्कम 9 लाख 1 हजार रुपये, कॉर्पोरेशन बँक प्रोत्साहनपर लाभाचे लाभार्थी 37 रक्कम 4 लाख 15 हजार रुपये. स्टेट बँक ऑफ इंडिया 59 लाभार्थी रक्कम 32 लाख 98 हजार 730 रुपये, देना बँक प्रोत्साहनपर 26 लाभार्थी रक्कम 8 लाख 45 हजार रुपये, सिंडीकेट बँक 19 लाभार्थी रक्कम 7 लाख 71 हजार रुपये व प्रोत्साहनपर लाभार्थी 7 रक्कम 95 हजार रुपये. युको बँक प्रोत्साहनपर 8 लाभार्थी रक्कम 1 लाख 45 हजार रुपये, युनिअन बँक ऑफ इंडिया कर्जमाफीस पात्र लाभार्थी 48 रक्कम 13 लाख 6 हजार रुपये व प्रोत्साहनपर लाभार्थी 210 रक्कम 47 लाख 32 हजार रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँक कर्जमाफीस पात्र लाभार्थी 360 रक्कम 2 कोटी 49 लाख 80 हजार 485 रुपये व प्रोत्साहनपर 32 लाभार्थी रक्कम 4 लाख 45 हजार. 7 डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार मुद्दल व व्याजासह 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक- यांसाठी एक वेळ समझोता योजना (ओटीएस) जाहीर करण्यात आली आहे. पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची 1 लाख 50हजारांपेक्षा जास्त असलेली संपूर्ण रक्कम 31 मार्च 2018 पर्यंत बँकेत जमा केल्यावर शासनातर्फे 1 लाख 50 हजार रुपये लाभांची रक्कम शेतक-यांना संबंधित बँकामार्फत अदा करण्यात येणार आहे.