Breaking News

मोफत स्रीरोग तपासणी व वंध्यत्व निवारण तपासणी शिबिराचे आयोजन ..

भेंडा/प्रतिनिधि/-नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील जनकल्याण फौंडेशन व जनकल्याण सार्वजनिक वाचनालय नेहमीच सामाजिक कार्याला महत्व देवून समाजासाठी कोणत्याही स्वरूपाचा योगदान देत असून यावर्षीही मोफत स्रीरोग तपासणी व वंध्यत्व निवारण व तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे .


शिबिरामध्ये दीपक हॉस्पिटलची स्रीरोगतज्ञ ड.वैशाली किरण(एम.बी.बी.एस) रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहे .तरीही जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जनकल्याण फौंडेशन व जनकल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा शुभारंभ ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय गोंडेगाव याठिकाणी दि .3/12/2017 रोजी सकाळी 10:00वाजता नेवासा पंचायत समितीच्या सभापती सौ .सुनीताताई गडाख , उपसभापती सौ .राजनंदिनी मंडलिक , राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले यांच्या हस्ते होणार आहे .