Breaking News

52 व्या अ.भा. मराठी विज्ञान अधिवेशनाला सुरूवात

सिंधुदुर्गनगरी, दि. 17, डिसेंबर - कोकण निसर्गसंपन्न आहे. सभोवतालचा निसर्ग वाचवायचा असेल तर त्याच्याकडे डोळसपणे पहायला शिका, अनेक मान्यवरांनी केलेल्या अशा आवाहनातच नेरूरपार इथल्या वसुंधरा संस्थेमध्ये 52 व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाला सुरूवात झाली. जैवविविधता संवर्धनातून शाश्‍वत जीवनमान असा संदेश देणार्‍या अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेच्या बावन्नाव्या विज्ञान अधिवेशनाच उद्घाटन भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष प्रभाकर देवधर यांच्या हस्ते तुळशीच्या रोपट्याला पाणी घालून झाले. 


मराठी विज्ञान परिषदेद्वारे दिले जाणारे मनमोहन शर्मा विज्ञान पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. पुण्याच्या डॉ. कल्पना जोशी आणि डॉ. पराग गोगटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सोळाव्या उत्तम विभाग पुरस्काराच देखील यावेळी वितरण करण्यात आले. रत्नागिरी, बिद्री, चाळीसगाव आणि जळगाव यातून जळगाव विभागाने हा पुरस्क ार मिळवला. भाऊ काटदरे यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला. वसुंधराचे संस्थापक सी.बी. नाईक आणि लता नाईक यांना यावेळी गौरवण्यात आले. नाईक यांच्या जीवनप्रवासावर माहितीपट दाखवण्यात आला. मराठी विज्ञान परिषदेने शिकाव अस नेटक आयोजन वसुंधराने केल्याचे कौतुकोद्गार उद्घाटक प्रभाकर देवधर यांनी काढले.