नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी 30 टक्के जमिनीचे भूसंपादन- मोपलवार
नाशिक, दि. 30, डिसेंबर - समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात 30 टक्के जमिनीचे भूसंपादन झाले असून नाशिक जिल्ह्यात संपादनाला कुठलाही विरोध नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी केला आहे.
समृद्धी महामार्ग प्रकरणी भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली मोपलवार यांची चौकशी सुरू होती. त्यामुळे त्यांना या पदावरून हटविण्यात आले होते.नुकताच चौकशी समितीच्या अहवालात त्यांना क्लिन चीट मिळाल्यामुळे त्यांची पुन्हा याच पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर ते शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन नंतर नाशिकला आले असता पत्रकारांशी बोलत होते.
माझ्या विरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. समृद्धी महामार्ग दोन वर्षात पूर्ण करणार असून राज्यात 37 टक्के भूसंपादन झाल्याचे त्यांनी सां गितले.नाशिकमध्ये 30 टक्के भूसंपादन झाले असून येत्या दोन महिन्यात राज्यातील भूसंपादन पूर्ण करणार असून भूसंपादनासाठी शेतकर्यांचा येथे विरोध नसल्याचे त्यांनी सां गितले. तसेच ज्या ठिकाणी विरोध होईल, तेथे संवादातून समस्या सोडविली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.