Breaking News

16 वर्षाखालील महिला क्रिकेट संघात नाशिकच्या तिघी

नाशिक, दि. 31, डिसेंबर - बीसीसीआय च्या वतीने मुंबई येथे दि 2 जानेवारी पासून घेण्यात येणार्‍या पश्‍चिम विभागीय 16 वर्षाखालील महिला क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात नाशिक च्या साक्षी कानडी, रसिका शिंदे व ईश्‍वरी सावकार यांची अंतिम 15 खेळाडूंच्या चमूत निवड झाली, महाराष्ट्र संघ गुजरात, मुंबई व बडोदा या संघाशी लढत देणार आहे.


सिन्नर ची साक्षी कानडी हिस उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, साक्षी ने यापूर्वी महाराष्ट्र 16 व 19 वर्षाखालील महिला संघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर रसिक शिंदे ने आंतर शालेय स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केली आहे, ईश्‍वरी सावकारची पहिल्यांदाच महाराष्ट्र संघात निवड झाली असून धुळे येथे झालेल्या निवड सामन्यांमध्ये तिने उत्कृष्ठ कामगिरो करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते, नाशिक च्या तीन मुलींची एकाच वेळी महाराष्ट्र संघात निवड होण्याची पहिलीच वेळ आहे, त्यामुळे भविष्यात नाशिक च्या महिला 
क्रिकेट साठी या निवडीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे भावना गवळी व सुनील मालुसरे या प्रशिक्षकांमार्फत मुलींसाठी सराव शिबीर वर्षभर सुरू असते, महिला क्रिकेट वाढी साठी माजी महिला खेळाडू शर्मिला साळी, चारुता संगमनेरकर व सुचिता कुकडे याची समिती नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ने केली आहे, यासर्व महिला खेळाडूंना या अनुभवी समिती मार्फत चांगले मार्गदर्शन मिळते आहे, महाराष्ट्र संघात निवड झाल्या बद्दल या तिघींचे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.