Breaking News

बॉम्बे स्टाँक एक्सचेंज अंतर्गत भागभांडवल उभारणी मार्गदर्शन संपन्न

नगर- लघु व मध्यम उद्योगांनी स्वतःचे बाजारमूल्य वाढविण्यासाठी स्वतःचा उद्योग पब्लिक लिमिटेड करून भांडवल उभारणीसाठी करून घ्यावी. स्वत:चे भांडवल व बेन्केचे कर्ज यावर उद्योग करण्यास मर्यादा येतात व नफा जास्त होत नाही ,शेअर द्वारे भांडवल उभारणीतून आर्थिक जोखीम तर कमी होतेच पण विश्वासहार्ता व बाजारातील मूल्यहि वाढते , हे ओळखून आज लघु व मध्यम उद्योजकांची पत व बाजारमूल्यवृद्धीसाठी भांडवल उभारणी अतिशय उत्तम पर्याय असल्याचे मत बॉम्बे स्टाँक एक्स्चेंज व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आशिष चौहान यांनी व्यक्त केले.

अहमदनगर सीए शाखा ,आमी व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नगर सीए भवन येथे आयोजित बॉम्बे स्टाँक एक्सचेंज अंतर्गत भागभांडवल उभारणी मार्गदर्शन कार्यक्रमात बॉम्बे स्टाँक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आशिष चौहान व लघु व मध्यम उद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी खासदार दिलीप गांधी,रेज एनर्जीचे अभिजित लुणिया,टीजीएसबी बेन्केचे विभागीय अधिकारी दिनेश कामत,आमीचे दौलतराव शिंदे,मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रकास गांधी,नगर सीए शाखा अध्यक्ष सीए प्रसाद भंडारी,सचिव डॉ. परेश बोरा व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चौहन म्हणाले कि,२० वर्षापूर्वी जीएसटी , नोटाबंदी सारखे धाडसी निर्णय होणे गरजेचे होते, सध्याच्या परीस्थित झालेले हे निर्णय अतिशय योग्य असून सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठी फायद्याचे आहेत तसेच मध्यम व लघु उद्योजकाच्या आपेक्षा पूर्तीची नवी दिशा देणारे आहे. आज माहिती व तंत्रज्ञानाचा वेग पाहता येणारे नवे तंत्रज्ञान हे स्वप्नवत वाटणाऱ्या कल्पनांना वास्तवात आणणारे असूनयेत्या तिस वर्षात विश्वात सर्वात प्रगत व आर्थिक संपन्न म्हणून आपला देश असेल यात शंकाच नाही.

यावेळी खासदार दिलीप गांधी म्ह्नालेकी , देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टीने शासनाने घेतलेले निर्णय व स्वीकारलेली नवी धोरणे व विचार याचा फायदा नव उद्योजक व जुन्या लघु उद्योजकांना होणार आहे.शेअर मार्केट द्वारा भांडवल उभारणीचे फायदे अशा कार्यक्रमातून माहिती होऊन नगर मधील उद्योजक त्याचा निश्चित फायदा घेतील. यासाठी सीए असोसिएशन नेहमीच पुढाकार घेते .

अजय ठाकूर यांनी सांगितले कि एसएमई अंतर्गत २०१२ पासून छोट्या व मध्यम उद्योजकांना भाग भांडवल उभारणी परवानगी मिळाली ,गेल्या पाच वर्षात २११ उद्योजकांच्या कंपन्यानि त्याचा फायदा घेऊन १७०० करोडचे भाग भांडवल तर उभारले त्याच बरोबर आज त्याचे भाजार मूल्य २० हजार करोड पेक्षा अधिक आहे.आज बीएसई स्वत: उद्योजकांनकडे जाऊन याचे महत्व पटवून देत आहे .यासाठी राज्यात आजपर्यंत ९०० पेक्षा जास्त कार्यक्रमातून हजारो लघु उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

नगर सीए शाखेचे प्रसाद भंडारी यांनी उपस्थितांचे स्वागत व सत्कार केला. सीए नगर शाखेच्या विविध उपक्रमाची व नव्या उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.रेड एनर्जीचे अभिजित लुणिया व टीजीएसबी बेंक यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्यकेल्या बद्दल त्यांचे विशेष आभार मानले.कार्यक्रमास सीए रविंद्र कटारिया,सीए मोहन बरमेचा, सीए मर्दा ,उद्योजक,गुंतवणूकदार, सीए विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष सीए ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले तर आभार सचिव सीए डॉ. परेश बोरा यांनी मानले.