Breaking News

माजी आमदाराच्या मुलाची हत्या.

लखनौ : उत्तर प्रदेशच्या लखनौ येथील विधान भवनाजवळ एका माजी आमदाराच्या मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री डुमरियागंज येथील भाजपचे माजी आमदार जिप्पी तिवारी यांचा मुलगा वैभव तिवारी(३६) ला निवासस्थानातून खाली बोलावून घेतल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.


 या प्रकरणी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमुळे यूपीत राजकारण तापले असून, विरोधी पक्ष विधानसभेच्या चालू अधिवेशनात सोमवारी हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. दोन्ही सभागृहांत विरोधक यूपीतील भाजप सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित करणार आहेत.