लोकमंगल, सिद्धेश्वर, मातोश्रीसह 11 कारखान्यांच्या काट्यांची तपासणी
सोलापूर, दि. 30, डिसेंबर - साखर आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यातील 11 साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी केली आहे. येत्या आठवडाभरात सर्व वजनकाट्यांची तपासणी करून जिल्हाधिकारी साखर आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक एस. के. बागल यांनी दिली.
शेतकरी संघटनेच्या तक्रारीवरून साखर आयुक्तांनी राज्यातील सर्वच कारखान्यांचे वजनकाटे तपासणीचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तालुकनिहाय पथक स्थापन करून तपासणीचे आदेश दिले. पथकांमध्ये वैधमापन शास्त्र विभागाचा प्रतिनिधी, साखर आयुक्त कार्यालयाचा प्रतिनिधी, कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे. गेल्यास चार दिवसांमध्ये माळशिरस तालुक्यातील सहकारमहर्षी, पांडुरंग सहकारी, सासवड माळी शुगर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकमंगल, गोकुळ शुगर, जयहिंद शुगर, करमाळा तालुक्यातील आदिनाथ, भैरवनाथ फॅबटेक, उत्तर सोलापूर तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी, मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये सर्व कारखान्यांचे वजनकाटे योग्य असल्याचे दिसून आल्याचे बागल यांनी सां गितले.