संगमनेरात वाहतुकीचा उडाला बोजवारा! चक्क दुभाजकावरून बस घुसली
शैक्षणिक विकास आणि उदयॊगधंद्यांत अवघ्या राज्यात प्रसिद्ध असलेल्या संगमनेर शहरात सिग्नल व्यवस्था नसल्यातच जमा आहे. या व्यवस्थेचा कधी वापर होताना दिसत झालेला नाही. याकडे वाहतूक पोलीस व नगरपालिका प्रशासन सोयीस्कररित्या नुसार दुर्लक्ष करत आहेत. याचा परिणाम शहरातील सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. आज सकाळच्या घटनेत अकोल्याहून येणाऱ्या बसचालकाचा बसस्थानकात गाडी घालण्याच्या प्रयत्नात त्याचा बसवरील सुटला. त्यामुळे सदर बस परिसरातील दुभाजक ओलांडून थेट बसस्थानकाबाहेर असलेल्या दुकानांत जाऊन घुसली. सुदैवाने या घटनेत काही जिवितहानी झाली नाही. या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे काही दिवसांपूर्वी अकोलेकडून येणाऱ्या वाहनांना बसस्थानकात येण्यासाठी उत्तरेकडील प्रवेश बंद करण्यात आला.
अकोले रस्त्यावरून बसस्थानकाकडे येणाऱ्या वाहनांसाठी दुभाजक टाकल्यामुळे सर्व वाहनांना स्थानकात प्रवेश करण्यासाठी किंवा शहरात येण्यासाठी विश्रामगृहाला वळसा घालून जावे लागते. त्यामुळे काही वाहनचालक कंटाळा करत उजव्याबाजून सर्व वाहने घालतात. परिणामी वाहतूक कोंडीत सातत्याने वाढ होत आहे. अकोलेकडून येणाऱ्या मोठमोठ्या गाड्यादेखील उजव्या बाजून घुसून वाहतूक कोंडी करतात. वाहनांच्या या बेशिस्तीला आवर घालण्याचे काम वाहतूक पोलिसांकडे असताना ते मात्र या सगळ्याकडे गंमत म्हणून बघत आहेत. त्यातच वाहतूक पोलिसांनी आपल्या सोयीसाठी अकोले वळणावर तात्पुरता तयार करण्यात आलेला रेतीच्या डब्यांचा दुभाजक काढून टाकावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.