Breaking News

नाशकात थंडीचा पारा 10 अंशावर

नाशिक, दि. 20, डिसेंबर - आज नाशिकमध्ये राज्यातील सर्वांत कमी सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. गार वारा सोबत थंडी आणि ढगाळ अशा वेगळ्या वातावरणाचा अनुभव नाशिककरांनी घेतला. नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे मात्र ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपासून दिवसही स्वेटर अंगात घालून सध्या नाशिककरांचा सध्या वावर सुरु आहे. अजून 24 तास परिसरात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तसेच ढगाळ वातावरण आणि वाढलेली थंडी यामुळे सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून दवाखानेही फुल्ल झाली आहेत. या वातावरणाचा सर्वाधिक त्रास दमा, संधिवातासारख्या जुनाट व्याधी असणार्‍या रुग्णांना होतो त्यामुळे अशा रुग्णांच्या संख्येतदेखील कमालीची वाढ झालेली बघावयास मिळत आहे.