वसईत महसूल पथकावर वाळू माफियांनी केली दगडफेक.
वसई, दि. 23, नोव्हेंबर - टेंभीखोडावे रेतीबंदरावर कारवाई करत असताना, समुद्रात वसईच्या महसूल पथकावर दगडफेक करण्यात आली असून यात एका तलाठीसह तीन ग्रामस्थ जखमी झाले आहेत. हरेश्वर म्हात्रे, किशोर पाटील आणि विजय पाटील अशी जखमी ग्रामस्थांची नावे आहेत.
वसई तहसिलदार आणि पालघर तहसिलदार यांची वाळू मा फियांविरोधात सयुंक्त कारवाई करण्यात येत होते. या कारवाईसाठी दोन तहसिलदार आणि 20 तलाठ्यांसह दहा अधिकारी होते. मात्र कारवाईसाठी भर समुद्रात टेंभीखोडावे रेतीबंदराजवळ आल्यावर तेथील वाळू माफियांनी कारवाई रोखण्यासाठी अधिकार्यांच्या बोटीवर देगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.