मोदींचा हात आणि गळा कापू शकणारेही बरेच लोक या देशात !
ओबीसी मेळाव्यात भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी मोदींकडे जे बोट दाखवतील त्यांचे हात कापू असं विधान केलं होतं. त्यावरून बरीच टीका करण्यात आली होती.त्यानंतर राय यांनी या विधानासाठी माफीही मागितली होती.
तसंच सीबीआयच्या नोटीसांबद्दल विचारले असता आपण या संस्थांना भीक घालत नाही आणि उत्तर ही देणार नाही असं उत्तर राबडी देवींनी दिलं.सीबीआयला जर राबडी देवींची चौकशी करायची असेल तर त्यांच्या घरी येऊन विचारावं अशी टीकाही त्यांनी केली.