Breaking News

ब्रम्होस सुपरसॅनिक क्रुझ मिसाईलची आज यशस्वी चाचणी


ब्रह्मोस सुपरसॅनिक क्रुझ मिसाईलची आज यशस्वी चाचणी झालीये. सुखोई-30 MKI या फाईटर विमानाला ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडून त्याची चाचणी झाली. अशी चाचणी याआधी कधीही झाली नाही. आतापर्यंत ब्रह्मोस फक्त जमीन किंवा समुद्रातूनच प्रक्षेपित करण्यात आलं होतं. ८ ते ९ किलोमीटर इतक्या उंचीवरून ते प्रक्षेपित केलं गेलं.

बंगालच्या उपसागरात एक जुनं जहाज आणलं गेलं. ते या चाचणीत टार्गेट म्हणून वापरलं. २ सुखोई विमानं यासाठी सज्ज ठेवली होती. एकातून प्रक्षेपण केलं गेलं, एक स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आलं होतं. याचा फायदा असा की याची क्षमता हजार किलोमीटर असल्यामुळे टार्गेटच्या जवळ जाण्याची गरज नाही. शत्रूचे बंकर असो, किंवा जमिनीखालचं कंट्रोल सेंटर. चेन्नईच्या हवाई तळावरून उड्डाण केलेल्या सुखोई लढाऊ विमानाला कराचीवर हल्ला करण्याची क्षमता यानं लाभेल.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा