अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विल्यम्स आणि व्यावसायिक अॅलेक्सिस ओहानियन यांचा विवाह थाटामाटात पार पडला. दक्षिण अमेरिकेतील कंटेम्पररी कला केंद्र न्यू ओरलेन्स या ठिकाणी पार पडलेल्या विवाह समारंभात २५० लोकांनी हजेरी लावली होती. सेरेना आणि अॅलेक्सिस यांनी ३० डिसेंबर २०१६ मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच सेरेनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सेरेना आणि अॅलेक्सिस यांना अडीच महिन्यांची मुलगी आहे.