नवी मुंबईमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण
ठाणे, दि. 16, नोव्हेंबर - नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात एका तरुणाने वाहतूक पोलिसाला भररस्त्यात शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना मोबाईल कॅमेर्यात कैद झाली असून, या घटनेची ध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.
कोपरखैरणे येथील ब्लू डायमंड परिसरात वाहतूक पोलीस तानाजी रामचंद्र पाटील (45) हे ऑन ड्युटी असताना दानीश इब्राहिम शेख (21) हा तरुण मैत्रिणीसोबत दुचाकीवरू न जात होता. वाहतूक पोलीस तानाजी पाटील यांनी दानीषला हटकले आणि गाडीचे कागदपत्र मागितले.

यावरून वाद निर्माण होत दानिशने शिविगाळ करण्यास सुरुवात केली. मैत्रिणीसमोर अपमान झाल्याने दानीशने वाहतूक पोलीस तानाजी पाटील यांच्या कानशिलात लगावल्यामुळे वाहतूक पोलीस तानाजी पाटील खाली कोसळले.