केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मातृशोक.
मुंबई, दि. 16, नोव्हेंबर - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आईचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या.
हौसाबाई बंडू आठवले असे रामदास आठवले यांच्या आईचे नाव असून वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात
हौसाबाई बंडू आठवले असे रामदास आठवले यांच्या आईचे नाव असून वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात
त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हौसाबाई आठवले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ’संविधान’ बंगल्यावर सकाळी 11 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता वांद्रे येथील खेरवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पा र्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
