फळे व भाजीपाला निर्यातीसाठी शेतकर्यांनी अर्ज करावेत - राजेंद्र साबळे
सांगली, दि. 16, नोव्हेंबर - निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब, आंबा व भाजीपाला शेतांची, बागेची नोंदणी, नुतनीकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. त्याअनुषंगाने सन 2017-18 या वर्षामध्ये युरोपियन देशांना फळे व भाजीपाला निर्यात करू इच्छिणार्या शेतकर्यांनी त्यांच्या शेतांची, बागेची नुतनीकरण किंवा नवीन बागांची नोंदणी अपेड या ऑनलाईन प्रणालीव्दारे करावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी निर्यातक्षम फळे व भाजीपाला उत्पादनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी केले आहे.
साबळे म्हणाले, निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब, आंबा व भाजीपाला शेतांची, बागेची नोंदणी, नुतनीकयासाठी अर्जदाराने विहीत प्रपत्रात अर्ज मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. या अर्जामध्ये त्याचा मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. नोंदणी अर्जासोबत शेताचा, बागेचा नकाशा व सातबाराची प्रत जोडणे आवश्यक आहे. द्राक्ष (ग्रेपनेट) पिकाचा नों दणी कालावधी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2017 असून विलंब शुल्कासह 31 डिसेंबर 2017 आहे. डाळिंब (अनारनेट) पिकाचा नोंदणी कालावधी 1 ऑक्टोबर 2017 ते 31 जानेवारी 2018 आहे. आंबा (मँगोनेट) पिकाचा नोंदणी कालावधी 1 नोव्हेंबर 2017 ते 31 जानेवारी 2018 (अमेरिकेला निर्यात करण्यासाठी नोंदणीचा अंतीम तदनांक 31 डिसेंबर 2017) आहे. तर भाजीपाला (व्हेजनेट) पिकाच्या नोंदणीसाठी वर्षभर लागवडीनंतर 15 दिवसांनी परंतु काढणीच्या 1 महिना अगोदर असा नोंदणी कालावधी आहे.

युरोपियन देशांनी कृषिमाल आयात करताना किडनाशक उर्वरित अंशचे प्रमाण क्षम्य मर्यादेच्या आत ठेवण्याचे स्वत:चे निकष ठरविलेले आहेत. त्यामुळे निर्यातदार देशांना ज्या देशांना कृषिमाल निर्यात करावयाचे आहेत, त्या देशातील नियम व अटींची पूर्तता करणे बंधनकारक झाले आहे. अपेडा (ग्रीक्ल्चरल प्रोसेस प्रोडक्ट डेव्हलपमेंट थॉरिटी)) ही वा णिज्य मंत्रालय अंतर्गत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे. अपेडाची वेबसाईट ही जगामध्ये सर्व आयातदारामार्फत वापरली जाते. तसेच आयातदाराची निवड करताना खात्रीलायक निर्यातदार म्हणून ओळख होण्यास मदत होते. त्याकरिता अपेडावर ऑनलाईन प्रणालीव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व अर्ज संबधित तालुका कृ षि अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी शेतकर्यांनी नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.