आरोपींच्या फाशीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील - दीपक केसरकर
सांगली, दि. 13, नोव्हेंबर - अनिकेत कोथळे याच्या हत्येप्रकरणी जबाबदार असणार्या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. त्यासाठी संबंधित न्यायालयात ज्येष्ठ वकीलामार्फत भक्कमपणे पुराव्यानिशी बाजू मांडणार आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिली. या हत्येप्रकरणी आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न पोलिस अधिकार्यांकडून झाला असल्यास वरिष्ठ अधिकार्यांची नियुक्ती करून स्वतंत्रपणे सांगली जिल्हा पोलिस दलाची सखोल चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सांगली शहर पोलिस ठाण्यात अनिकेत कोथळे याचा केलेला खून व पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळल्याची घटना अत्यंत दुर्देवी आहे. अशा घटना यापुढील कालावधीत घडू नयेत, यासाठी काही उपाययोजना व बदल अंमलात आणण्याचा विचार आहे. सांगली शहर पोलिसांनी केलेले जे क्रूर कृत्य ते योग्य नाही. त्यामुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा डागाळली आहे. ही प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. केवळ सांगली जिल्हाच नव्हे, तर राज्यातील पो लिस दलातील चुका शोधून त्या दुरूस्त केल्या जातील.
सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय कृती समिती यांच्या मागणीनुसार हा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल व या खटल्याकामी सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. अनिकेत कोथळे याच्या पत्नीला शासकीय सेवेत सामावून घेण्यासह या कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून येत्या दोन दिवसात निश्चितपणे निर्णय जाहीर केला जाईल, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

घडलेला प्रकार संपूर्ण पोलिस दलाला अशोभनीय आहे. त्यामुळेच तातडीने कारवाई केली आहे. याशिवाय या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिला आहे. ही घटना घडली, त्यावेळी आपण महाराष्ट्राबाहेर होतो. या घटनेची माहिती मिळताच आपण याठिकाणी येणार होतो. मात्र तपास प्रक्रियेवर दबाव येऊ नये व त्याचा लाभ आरोपींना होऊ नये, यासाठीच आपण दोन दिवस उशिराने आलो. युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी जे कृत्य केले, ते अत्यंत अमानुष आहे. राज्य गुन्हा अन्वेषण विभाग निपक्षः पातीपणे या प्रकरणाचा तपास करेल. परंतु या तपासासाठी त्यांना वेळेची मोकळीक देण्याची गरज आहे. परिणामी आताच या घटनेबाबत मत व्यक्त करणे योग्य होणार नाही.