जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण - राम शिंदे
नाशिक, दि. 13, नोव्हेंबर - जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे पण बदलत्या स्थितीनुसार शेतीसाठी मुबलक पाणी वापर करु नये, पीकनिहाय ठिबक अथवा स्प्रिंकलर सारख्या सिंचन पध्दतीने पाण्याचा नियंत्रीत वापर करावा, असे आवाहन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केले आहे.
येवला तालुक्यातील कातरणी येथील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहाणी दौर्याप्रसंगी ते बोलत होते. श्री. शिंदे यांनी आज येथील वनविभाग, कृषी विभागांनी केलेल्या क ामांची पाहाणी केली. तसेच तालुक्यातील विसापूर येथील शेतकर्यांच्या शेतातील शेततळे, विहीरींच्या पाणी पातळीची पाहाणी करुन त्यांनी आढावा घेतला.
शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेतून राज्यात झालेल्या कामाचा फायदा शेतकर्यांना झाला असल्याचे दिसून आले आहे.जीडब्लूएस या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये जमीनीतील पाणीपातळी वाढल्याचे दिसून आले आहे. याची प्रत्यक्ष पाहाणी करण्यासाठी नाशिक विभागातील तीन जिल्ह्यातील गावांमध्ये अचानक पाहाणी दौरा करत असून शेतकर्यांच्या प्रति क्रिया जाणून घेण्याचा शासनाचा उद्देश आहे.
शिंदे म्हणाले, शासनाने केलेल्या कर्जमाफीची रक्कम चार महिन्यांच्या कमी कालावधीत थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा होत आहे. सर्व शेतकर्यांना दीड लाख रुपयांच्या क र्जमाफीचा लाभ देण्यात येत असून त्यासाठी जमीनीची मर्यादा देखील काढून टाकल्याने सर्वांना लाभ मिळणार आहे.
कर्जमाफीसाठी ऑनलाइन प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना त्यातील मंजूरी सहीत बँक खात्यात रक्कम जमा होत असल्याचे संदेश मिळतील. यासाठी त्यांचे मोबाईल क्रमांक देखील घेण्यात आले होते. राज्यातील शेतकर्यांना 35 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देता यावी यासाठी विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये 20 हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली व उर्वरित तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात येईल असे मंत्री श्री शिंदे म्हणाले.

ते म्हणाले, या गावांमध्ये विहीरींना पूर्वी पावसाळ्यानंतर पाणी राहात नव्हते असे शेतकर्यांचे म्हणणे होते. पण आता या कामांनंतर सध्या पाणी असून त्यामध्ये कांद्याचे पीक घेतले जात असल्याचे दिसून आले आहे. या पाण्यामुळे उत्पादन वाढून शेतकर्यांना फायदा मिळणार आहे. जलयुक्त योजनेतून यालुक्यात व जिल्ह्यातील अधिकाधिक गावांमध्ये कामे घेण्याचे नियोजन शासनाच्या विविध विभागांकडून केले जात आहे. भविष्यात याचा फायदा मिळेल, असे मंत्री शिंदे म्हणाले.