कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव सुरू - सुभाष भामरे
देशातील सर्व कँटोनमेंट बोर्ड्स येत्या काही महिन्यात हागणदारीमुक्त करावीत, अशा सूचना दिल्याचे डॉ. भामरे यांनी येथे सांगितले. पुणे कँटोन्मेंट बोर्डाला 200 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घघाटन भामरे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे कँटोन्मेंटमधील दोन रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पुलांचे बांधकाम लवकरच सुरु होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. हागणदारी मुक्त झालेल्या 11 कँटोन्मेंट्सना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
