Breaking News

गुटखा किंग बापाच्या मृत्यूनंतर मुलीनी त्यांची अंत्ययात्रा काढली बँड-बाजा लावून .

राजधानी दिल्लीत एक विचित्र घटना घडली, बापाच्या मृत्यूनंतर मुलीनी त्यांची अंत्ययात्रा चक्क बँड-बाजा लावून काढली. तसेच मुलींनी या यात्रेत डान्सही केला. दिल्लीतील पान विक्रेता असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष 'गुटखा किंग' हरिभाई लालवानी यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते पण शुक्रवारी त्यांचं निधन झालं.


लालवानी यांनी मृत्यूपूर्वी एक शेवटची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं की, “त्यांच्या मृत्यूनंतर कोणीही शोक व्यक्त करु नये. उलट त्यांच्या निधनादिवशी उत्सव साजरा करावा.” लालवानींच्या इच्छेनुसार, मुलींनी वडिलांची अंत्ययात्रा अतिशय दणक्यात काढली. 

या अंत्ययात्रेसाठी बँड-बाजा लावण्यात आला होता. विशेष म्हणजे, मुलींनी यावेळी डान्स करुन वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केली. लालवानी यांना चारही मुलींनीच खांदा दिला. तर त्यांच्या एका मुलीने मुखाग्नी दिला.