Breaking News

शासनाकडून मिळालेल्या 25 कोटीतून शहर विकासाच्या कामांना प्राधान्य द्यावे - पालकमंत्री

नाशिक, दि. 12, नोव्हेंबर - जळगाव महानगरपालिकेला शासनाकडून मिळालेल्या 25 कोटी रुपये निधीतून शहराच्या विकास कामांना प्राधान्य द्यावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.जळगाव शहरात विकासाची कामे होण्यासाठी शासनाने महानगरपालिकेस 25 कोटी रुपयांचा निधीतून उपलब्ध करुन दिला आहे. या निधीच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांना प्राधान्य देण्यात यावे व ती वेळेत पूर्ण करावीत. 


शासनाने दिलेल्या निधीतून करावयाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.यावेळी शिवाजी नगर उड्डाणपुल, बजरंग पुलाजवळ उड्डाणपुल तयार करणे, शहरात एल.ए.डी. लाईट लावणे, वाढीव भागात भूयारी गटारी करणे तसेच इतर विकासात्मक कामे करणे आदी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.