Breaking News

मेहकर येथे अखेर शेतमाल खरेदी केंद्र सुरू

बुलडाणा, दि. 3, नोव्हेंबर -  शासनाकडून नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू  करण्यात आले आहे. उडीद, मूग, सोयाबीन या पिकांची हमी  भावाने खरेदी सुरू करण्यात आली आहे.  आ. संजय रायमुलकर  यांच्या हस्ते या नाफेड खरेदी केंद्राचा शुभारंभ 30 ऑक्टोबर  रोजी करण्यात आला. यामध्ये उडीद 5 हजार 400 रुपये, मूग 5 हजार 575 रुपये,   सोयाबीन 3 हजार 50 रुपये या हमी भावाने खरेदी करण्यात  येणार आहे. सदर खरेदी ऑनलाइन पद्धतीने नोंद करून करण्यात येत असून, ज्या शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंद झाली  आहे,  अशा शेतकर्‍यांची उडीद, मूग, सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात  आली आहे.
यावेळी शेतकर्‍यांनी 2017-18 चा नोंद झालेला  सातबारा, पेरेपत्रक, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स  खरेदी-विक्री संघाकडे सादर करून ऑनलाइन नोंद करून आपला  माल विक्रीसाठी आणावा. ज्या शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंद  नसेल त्यांचा धान्यमाल खरेदी करण्यात येणार नाही. शेतकर्‍यांनी  या नाफेड खरेदीचा लाभ घेण्याचे आवाहन आ. संजय  रायमुलकर यांनी केले आहे. शेतकरी भास्कर गोडे यांचा यावेळी  सत्कार करण्यात आला.