Breaking News

हगणदारीमुक्तीचा ग्रामस्थांनी संकल्प करावा-सदाभाऊ खोत

बुलडाणा, दि. 3, नोव्हेंबर - उघड्यावर शौचास केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार फैलावतात. या आजारांमुळे शारीरिक  व मानसिक नुकसान मोठ्यसा प्रमाणावर होते. महाराष्ट्र  एक स्वच्छ राज्य आहे. असा आदर्श आपण देशात घालून दिला आहे. त्याची सुरूवात ही गावापासून होत असते. त्यामुळे या दुर्गंधीला नेहमीसाठी दूर सारण्याला ग्रामस्थांनी  हगणदारीमुक्तीचा संकल्प करावा, असे आवाहन स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केले.
चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथे त्यांच्या हस्ते शौचालय बांधकाम, भूमीपुजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी येथील मंदीरात आयोजित कार्यक्रमात ते होते. यावेळी  गटविकास अधिकारी, ग्रामसवेक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरूवातीला विजय आत्माराम ठेंग यांच्या शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच गजानन आत्माराम  ठेंग यांचे शौचालयाचे बांधकाम व  मुरलीधर वामन सांगळे यांच्या शौचालयाचे भूमीपुजन करण्यात आले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक  व ग्रामस्थांची उपस्थिती होती.