Breaking News

ऑक्टोबरच्या जीआरचा शिक्षकांकडून काळ्या फिती लावून निषेध

बुलडाणा, दि. 3, नोव्हेंबर -  वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत 23 ऑक्टोंबरला शिक्षक विभगाने काढलेल्य जिआरचा आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून काळ्या फिती लावून निषेध  करण्यात आला. 
गेल्या काही दिवसांपासून शिक्षक विभाग चित्र-विचित्र प्रयोग करीत असून शिक्षकांचे शिवकणे कमी व बाबुगीरीचे काम अधिक सुरू आहे. यांचे कारण शासन व शिक्षक विभाग आहे.  23 ऑक्टोंबरला वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत काढलेला जिआर अन्यायकारक आहे. या जिआरमधल क्रमांक 4 ची अट असंविधानिक असून 1981 मधील अनूसुचित ’क’चा उ ल्लंघन करणारी आहे. या बाबतची कायदेशिर तरतुद असल्याने या तरतुदीला डावलण्याचा अधिकार शिक्षण विभागाला नाही त्यामुळेच ही अन्यायकारक तरतुद रद्द करावी अशी एक मुखी मागणी संपूर्ण राज्यात सर्वच शिक्षक संघटना करत आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे संपूर्ण राज्यात शिक्षकांनी काळ्या फिता लावून शासनाच्या या तुघलकी निर्णयाचा  निषेध करण्यात आला.
खामगाव व परिसरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अमरावती विभाग सहकार्यवाह राजेंद्र चौथवे यांच्या नेतृत्वात टिळक राष्ट्रीय विद्यालय, ए.के. नॅशनल हायस्कुल, जी.वी. मेहता  नवयुग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुळ बधीर विद्यालय, अंजुमन, निपाणा, गुप्तेश्‍वर विद्यालय शिर्ला नेमाने, राष्ट्रमाता इंदिरा गांधी न.प. हायस्कुल शेगाव येथे काळ्याफित लावून  शासनाच्या जीआर चा निषेध करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र रज्य शिक्षक परिषदेचे खामगाव तालुकाध्यक्ष अनिल जवंजाळ, तालुका कार्यवाहक संजय बोरे, रामेश्‍वर जोहरी, नितीन  बोंबटकार, शिवदास कोल्हे, विजय जाधव, खालीद सर, गोपाल इंगळे यांनी आंदोलन यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.