गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ पिंपरी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आंदोलन
पुणे, दि. 07, नोव्हेंबर - दारुला महिलांची नावे द्या म्हणजे त्यांचा खप चांगला होईल, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ (सोमवारी) पिंपरी येथे पिंपरी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी अकरा वाजता शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पिंपरी -चिंचवड राष्ट्रवादीचे पक्ष प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका निकिता कदम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी वैशाली काळभोर म्हणाल्या की, नाशिक जिल्हा पालकमंत्री यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची माफी मागावी अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल.