जळगाव महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढणार - गुलाबराव पाटील
जळगाव, दि. 07, नोव्हेंबर - जळगाव महापालिकेची आगामी निवडनुक डोळ्यासमोर ठेवून पक्षीय संघटन वाढवणार असून जळगाव महानगरपालिका शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगामी मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने पक्षीय संघटन वाढवण्याचा अजेंडा ठेवला आहे. मनपा निवडणुकीत माजी आमदार सुरेशदादा जैन यांना सोबत घेवून शिवसेना चिन्हावर निवडणूक लढवली जाईल. भाजपने ज्या पद्धतीने नारायण राणे पॅटर्नप्रमाणे सर्व आघाड्यांना सोबत घेतले आहे. तोच पॅटर्न वापरून शिवसेना स्थानिक पातळीवर आघाड्यांना देखील सोबत घेईल. परंतु, त्यात पक्ष चिन्हावर निवडणुक लढवणार हे नक्की असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.