Breaking News

पुणे जिल्ह्याकरिता शासनाचे 25.86 लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट

पुणे, दि. 07, नोव्हेंबर - राज्यात आगामी वर्षामध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. त्यास अनुसरुन पुणे जिल्ह्याकरिता शासनाने  25.86 लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. यावेळी जिल्ह्याला दिलेले हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव  यांनी केली.
यंदा वृक्ष लागवडीसाठी 100 पैकी 15 टक्के बांबु, 15 टक्के औषधी वनस्पतींची निवड प्राधान्याने करण्यात आली आहे. यासाठी बांबुचे बियाणे गडचिरोलीहून उपलब्ध करण्यात आले  आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी यावेळी दिली. यंदाच्या वृक्ष लागवडीचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकांच्या शाळा, लोकप्रतिनिधी, अशासकिय  संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तसेच खाजगी पर्यटन स्थळाच्या जवळ असलेल्या वन विभागाच्या जागेत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.