जळगाव, दि. 10, नोव्हेबर - धरणगाव येथे तालुका काँग्रेस कमेटीतर्फे निदर्शने करून केंद्र व राज्य सरकारचा नोट बंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्याचा निषेधार्थ काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. नायब तहसीलदार कर्वे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात तालुका अध्यक्ष रतिलाल चौधरी, शहरअध्यक्ष राजेंद्र न्हायदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थित होती.