जामनेरला नोटबंदी वर्षपूर्तीनिमित्त युवा सेनेचे गाजर वाटप
जळगाव, दि. 10, नोव्हेबर - जामनेर येथे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गाजर वाटप करुन नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचा निषेध केला. नगर पालिका चौकात हा कार्यक्रम झाला. उप जिल्हाप्रमुख अँड. भरत पवार, अनिल चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी जि.प.सदस्य संजय गरूड यांच्या नेतृत्त्वाखाली नोटबंदीचे वर्षश्राद्ध घालण्यात आले.
