Breaking News

रावेरात काँग्रेसतर्फे नोटबंदीचा काळा दिवस साजरा

जळगाव, दि. 10, नोव्हेबर - रावेर तालुका कॉग्रेस कमिटीतर्फे नोटबंदी विरोधात माजी आ. शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून काळा दिवस साजरा करून नायब  तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कॉग्रेस पक्षातर्फे काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. येथील पक्षाच्या कार्यालयातून तहसीलवर काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात  आला. यावेळी माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, ज्ञानेश्‍वर महाजन, डॉ.शब्बीर शेख यांच्यासह मोठ्या संख्येने कॉग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.