Breaking News

सिंधू, सायना, अरुणा उपांत्य फेरीत

नागपूर, दि. 07, नोव्हेंबर - अग्रमानांकित पी.व्ही. सिंधू, द्वितीय मानांकित सायना नेहवाल यांच्यासह अरुणा प्रभूदेसाई व तिस-या मानांकित जी. ऋत्विका शिवानीने महिला एके रीच्या उपांत्यपूर्व फेरीत विजय नोंदवून उपांत्य फेरीत धडक दिली. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या यजमानपदाखाली मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरु आहे.  स्पर्धेत, सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सत्रात उपांत्य पूर्व फेरीचे सामने झाले. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेत्या अग्रमानांकित आंध्रप्रदेशच्या पी.व्ही. सिंधून  उत्कृष्ट कामगिरी करत मध्यप्रदेशच्या श्रियांशी परदेशीला 21-11, 21-17 असे सरळ नमविले. सुमारे 30 मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूचे वर्चस्व राहिले. पहिला गेम सिंधूने  सहज जिंकला. मात्र, दुसरा गेम जिंकण्यास तिला थोडी मेहनत करावी लागली. उपउपांत्यपूर्व फेरीत सिंधूने महाराष्ट्राच्या रेवती देवस्थळेला 21-16, 21-2 असे सरळ पराभूत के ले.द्वितीय मानांकित आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पेट्रोलियमच्या सायना नेहवालनेही विजयी अभियान कायम ठेवले. सायनाने 33 मिनिटाच्या खेळात एअरपोर्ट ऑथॅरिटी ऑफ इंडियाच्या  आकर्षी कश्यपला 21-17, 21-10 असे सरळ नमवित उपांत्य फेरीत धडक दिली. उपउपांत्यपूर्व फेरीत सायनाने तेलंगणाच्या जी. वृषाली 21-12,21-10 असे नमविले होते.  उपांत्यपूर्व फेरीतील अन्य सामन्यात गोवा येथील अरूणा प्रभूदेसाईने रेल्वेच्या शैली राणेला 21-19,21-9 असे पराभूत करून स्पर्धेत आव्हान कायम ठेवले. तिसरी मानांकित साई  उत्तेजिता राव पराभूतमहिला एकेरीतील उपांत्यपूर्व फेरीत एक निकाल आश्‍चर्यचकित करणारा लागला. तिस-या मानांकित एअरपोर्ट ऑथॅरिटी ऑफ इंडियाच्या साई उत्तेजिता रावला  पराभवाचा सामना करावा लागला. उत्कृष्ट व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या जी. ऋत्विका शिवानीने 25 मिनिटाच्या खेळात तिस-या मानांकित  साई उत्तेजिता रावला 21-14,21-8 असा पराभवाचा धक्का दिला. उपउपांत्यपूर्व सामन्यातही पराभूत झालेल्या साई उत्तेजिता रावने एअर इंडियाच्या पूर्वा बर्वे 21-18,22-24,  21-17 असे पराभूत केले होते. परंतु, विजय नोंदविण्यासाठी उत्तेजिता रावला एक तास तीन मिनिटे खेळावे लागले. नागपूरच्या मृण्मयी, मालविका, रसिकाचे आव्हान संपुष्टातनागपूर  येथील प्रतिभावंत बॅडमिंटनपटू मृण्मयी सावजीला महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात आणि मालविका बन्सोड व रसिका राजेला महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा  सामना करावा लागला व त्यांचे आव्हान संपुष्टात आले. नागपूरच्या मृण्मय सावजी व मानसी गाडगीळ या जोडीने शिखा गौतम (एअर इंडिया) व रिया मुखर्जी ( रेल्वे) या जोडीला  21-19,21-16 असे पराभूत केले होते. परंतु, उपांत्यपूर्व फेरीत पेट्रोलियमच्या एन. सिक्की रेड्डी व अश्‍विनी पोन्नप्पा या जोडीने 19 मिनिटाता मृण्मयी सावजी व मनसी गाडगीळ या  जोडीला 21-10, 21-12 असे नमवत उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेत रविवारी झालेल्या दोन्ही सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचा धक्का देत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणा-या  मालविकाला सोमवारी पराभव स्वीकारावा लागला. मध्यप्रदेशच्या श्रियांशी परदेशीने मालविकाला 21-11,21-18 असे सरळ पराभूत केले. पहिल्या गेममध्ये डावखु-या मालविकाने  जोरदार झुंज दिली. परंतु, प्रथम आघाडी घेतल्यानंतरही मालविकाने हा खेळ 21-11 असा गमाविला. दुस-या डावात मालविकाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत 11-6 अशी  आघाडी घेतली. मात्र, श्रियांशीने दमदार खेळाच्या बळावर 17-17 अशी बरोबरी साधली व लागोपाठ गुण नोंदवून दुसरा गेम 21-18 असा जिंकून विजयी मोहीम कायम ठेवली व  मालविकाचे आव्हान संपुष्टात आनले. नागपूर येथील दुसरी प्रतिभावंत खेळाडू रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधित्व करणाजया सहाव्या मानांकित रसिका राजेही विजय नोंदविण्यात  अपयशी ठरली. पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या जी. ऋत्विका शिवानीने उत्कृष्ट व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत 47 मिनिटात रसिकाला 21-14, 21-5 असे पराभूत केले.