Breaking News

द्राक्ष बागांवर खोड किडीच्या भुंग्यांचे थैमान, शेतकरी संकटात

सोलापूर, दि. 07, नोव्हेंबर - परिसरातील द्राक्ष बागांवर खोड किडीच्या भुंग्यांनी थैमान घातले आहे. एका रात्रित जवळपास 12 द्राक्ष वेलाची खोडे भुंगे कट करत असल्याने  द्राक्षउत्पादक धास्तावले आहेत. परिसरात सुमारे 60 एकरावर पापरी येथील शेतकर्‍यांनी द्राक्ष बागेची लागवड केली आहे. द्राक्ष वेलींची चांगल्या प्रमाणात वाढ झाली असून, बागेस  लोखंडी फाउंडेशनही करण्यात आले आहे. आतापर्यंत द्राक्ष उत्पादकांचा एकरी ते लाख खर्च झाला आहे. काही दिवसांत बागांची छाटनी होणार आहे. मात्र आठवडाभरापासून खोड  भुंग्यांनी उपद्रव सुरू केला असून, ते भुंगे द्राक्षवेलीची खोडं कुरतडून टाकत आहेत. निम्म्याहून आदी भागातून द्राक्षवेल बाधित होत असल्याने त्याचा बहार धरण्यासाठी काहीच उपयोग  शेतकर्‍यांना होत नाही. ते फूट उंचीवर गेलेल्या वेलांचे फक्त खोडच शिल्लक राहत असल्याने लाखोंचा खर्च वाया जाण्याची भीती द्राक्ष उत्पादकांना वाटू लागली आहे. पापरी येथील  12 युवा शेतकर्‍यांनी 60 एकरच्या आसपास द्राक्ष बाबा खंदा नवीन प्रयोग म्हणून लागवड केली आहे. त्यासाठी बँक, पाहुणे, मित्रांकडून पैसे घेतले आहेत. बागा व्यवस्थित हाताळून  बहार धरण्याच्या स्थितीत असताना अचानक खोड भुंग्यांनी हल्ला सुरू केल्याने उत्पादक हतबल झाले आहेत. यासंदर्भात बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख कीटक शास्त्रज्ञ डॉ.  शाकीर सय्यद यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, भुंग्यांचा उपद्रव रोखण्यासाठी द्राक्ष वेलीच्या खोडाला बुरशीनाशक कीटकनाशकाचा लेप द्यावा. तसेच भुंगा, कीटक सापळे  बागेत लावावेत.