Breaking News

कोरियन चित्रपट महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि. 07, नोव्हेंबर -  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये दोन दिवसीय कोरियन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी रसिकांना कोरियन  चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सवात सहा कोरियन चित्रपट दाखवले जाणार आहेत, अशी माहिती मुंबईतील काऊन्सलेट जनरल ऑफ रिपब्लिक ऑफ कोरियाचे वा णिज्य दूत केनेथ बिन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 
बिन म्हणाले, दोन देशांच्या संस्कृतींमधील आदानप्रदान खूप महत्वाचे असते. कोरियन चित्रपटसृष्टीचा आवाका मर्यादित असला तरी नवनवीन विषय हाताळण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न  कायम असतो. दर वर्षी साधारपणे 150 चित्रपटांची निर्मिती होते. हे चित्रपट पाहण्याची संधी येथील रसिकांना महोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. महोत्सवात द थाईव्हज,  द फ्रंट लाईन, द सस्पेक्ट, कुंडो : एज ऑफ द रँपंट, वेलकम टु डॉग्ल्कगो, फॉरेव्हर - द मोमेंट, द सस्पेक्ट आदी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत, हे चित्रपट साधारणपणे 2  तासांचे आहेत. पुढील वर्षीच्या महोत्सवामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार यांच्याशी संवाद साधता यावा, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे बिन यांनी सांगितले.