दुकानाला लागलेली आगीत साहित्य भस्मसात
अहमदनगर, दि. 06, नोव्हेंबर - शहरातील कोरडगाव रोडवरील हरिजन वस्तीच्या जवळ सुतार व्यवसायाच्या दुकानाला लागलेली आग वेळीच तरुणांनी विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.देव्हार्यात लावलेल्या दिव्यामुळे ही आग लागली होती.यामध्ये दुकानात ठेवलेल्या मोटारीचे किरकोळ नुकसान झाले आहे.
या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहितीच्या अनुसार शहरातील कोरडगाव रोडवरील हरिजन वस्तीजवळ बबन सदाशिव चन्ने हे सुतार व्यवसाय साहित्य दुकानामध्ये होते. परवा रात्री चन्नेे दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री नऊ वाजता अचानक देव्हार्यात ठेवलेल्या दिव्यामुळे मोठी आग दुकानाला आग लागली. दुकानाला आग लागताच तरुणांनी धाव घेत दुकानाचा एका बाजूचा पत्रा तोडून आतमध्ये जात आग विझवली.
यावेळी दुकानातील दोन मोटारींचा काही भाग, तसेच किरकोळ स्वरूपाच्या काही वस्तू या आगीत भस्मसात झाल्या. आग विझवण्यासाठी योगेश चन्ने, अमोल बोरूडे, शैलेश कोरडे, इनुस बागवान, वैभव पुंड, शशिकांत साखरे, अजय गुरसाळी अशोक गोधळे, दत्ता सोनटक्के, ज्ञानेश्वर कोकाटे आदींनी सहकार्य केले.
दुकानाला आग लागल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवल्यानंतर कर्मचार्यांनी गाडी चालू करण्यासाठी मोटार उपलब्ध नसल्याचे कारण सांगत टाळाटाळ केली.
नंतर आग विझवल्यानंतर अर्ध्या तासाने पालिकेची अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी हजर झाली. यावेळी उशिरा गाडी आल्यामुळे उपस्थित असलेल्या नगरसेवक महेश बोरुडे यांनी संबंधित कर्मचार्यांना चांगलेच धारेवर धरले.