सोळा वर्षांनंतरही जमिनीचा मोबदला नाही
अहमदनगर, दि. 06, नोव्हेंबर - तालुक्याच्या पूर्व भागातून गेलेल्या नांदूर- मधमेश्वर जलदगती कालव्यावरील वितरिका क्रमांक 1 आणि 2 साठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला तब्बल 16 वर्षे उलटूनही अद्यापपर्यत मोबदला मिळाला नाही. विशेष म्हणजे अगोदरच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेला नसतांना या जमिनीचा मोबदला शासन तत्काळ देत आहे. त्यामुळे शासन असा दुजाभाव का करते आहे, असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकरी करत आहेत. शेतकर्यांमध्ये मात्र यामुळे शासनाविषयी तीव्र नाराजी पसरली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर या दोन तालुक्यांसाठी जलदगती कालव्याने पाणी देण्यासाठी सन 2004 मध्ये हा कालवा पूर्ण झाला आहे. या कालव्याच्या वितरिका क्र. 1 आणि 2 कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातून घोयेगाव, तळेगाव मळे, लौकी, धोत्रे, भोजडे व खोपडी या गावातून गेल्या आहेत. त्यासाठी लागणारी जमीन 2001 मध्ये संपादित केलेली आहे. वरील सर्वच गावातील पाचशेच्यावर शेतकर्यांचे जवळपास अंदाजे 100 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले होते. परंतु, यातील कोणालाच अद्यापपर्यंत मोबदला रक्कम मिळालेली नाही. तसेच धोत्रे व भोजडे गावातूनही वितरिकेसाठी काही जमीन घेण्यात आलेली आहे. पूर्वीच्या जमीनीचा मोबदला मिळालेला नसताना त्यातल्या काही शेतकर्यांची जमीन नागपूर-मुंबई महामार्गासाठी संपादित होत आहे. सन 2001 पासून कालव्याच्या वितरिकेसाठी अधिगृहित केलेल्या जमिनीचा मोबदला अद्यापपर्यंत मिळालेला नाही.
राज्यातील भाजपा सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प सम्रुधी महामार्ग याच गावातून जाणार आहे. याच प्रकल्पांतर्गत जाणार्या शेतजमिनीची खरेदी देखील सुरू झाली आहे. परंतु शेतकर्याप्रती हे शासन संवेदनशील असल्याची भावना सध्या या परिसरातील शेतकर्यांची झाली आहे. त्यातच मुंबई - नागपूर समृद्धीमहामार्गासाठी गेलेल्या जमिनीचा मोबदला केव्हाही मिळेल, याची खात्री आहे. परंतु नांदुर मधमेश्वर जलद गती कालव्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला कधी मिळतो, याबद्दल शेतकरी साशंक आहेत.
दरम्यान, यासंदर्भात नांदूर मध्यमेश्वर पाटबंधारे विभागीय कार्यालय, वैजापूरच्या अधिकार्याशी दूरवध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली.