संचालक मंडळ, कर्मचार्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
अहमदनगर, दि. 06, नोव्हेंबर - श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्या काष्टी ता श्रीगोंदा या संस्थेच्या चेअरमन ज्योती रमेश गवळी व मुदत ठेवी कलेक्शन करणारे त्यांचे पती रमेश सर्जेराव गवळी यांच्यासह संस्थेचे व्हा . चेअरमन यांच्यासह संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहकारी संस्थेत 34, 16, 900 रुपयांच्या मुदत ठेवी आणि बचत ठेवी परत मिळाल्या नसल्याने खातेदार अंबादास भानुदास राहिंज रा. कोष्टी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
श्रीगोंदा तालुकयातील काष्टी येथील धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था काष्टी येथे अंबादास भानुदास राहिंज वय 45 रा . काष्टी व सध्या उप जिल्हा रुग्णालय कर्जत येथे नेत्र चिकित्सक म्हणून नियुक्तीस असून ते मूळचे काष्टी येथील रहिवाशी आहेत. त्यांनी या महिला पतसंस्थेत मुदत ठेव आणि दैनंदिन ठेव रक्क्म रुपये 34, 16 , 900 रुपयांची रक्कम ठरलेल्या मुदतीत परत न करता ती संस्था चेअरमन व व्हा. चेअरमन तसेच संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी संगनमताने स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. मात्र त्या परत केल्या नाहीत घेतलेल्या ठेवीची रक्क्म बुडवुन ठेवीदारांची फ़सवूणक केली या ठेवी वारंवार मागितल्या असता खोटे सावकारी गुन्ह्यात अडकवण्याची धमकी या संस्था चालकांनी दिली असल्याने याबाबत अंबादास राहिंज यांनी फिर्याद दिल्याने संस्था अध्यक्ष ज्योती रमेश गवळी तसेच संस्थेचे कलेक्शन करणे त्यांचे पती रमेश सर्जेराव गवळी महिला संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसात भादवी कलम 420 , 406 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे स दर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करत असून संस्थेला टाळे लावून सर्वच संचालक आणि कर्मचारी फरार आहेत.