नाशिक सायकलीस्टसतर्फे बाल दिनानिमित्त ’ट्रेजर हंट’चे आयोजन
नाशिक सायकलीस्टसतर्फे नुकत्याच साजरा झालेल्या बाल दिनानिमित्त ट्रेजर हंटचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.18) दुपारी साडे तीन ते साडे पाच दरम्यान ही मनोरंजनात्मक स्पर्धा रंगणार असून नाशिक शहरात विशिष्ट मार्गांवर विविध ठिकाणी असलेल्या वस्तू शोधून स्पर्धा पूर्ण करणार्या बाल सायकलीस्टसला बक्षीस देण्यात येणार आहे.
वयवर्षे 8 ते 17 पर्यंतच्या बालकांमध्ये हा मनोरंजनात्मक स्पर्धेच्या एका संघात तीन सायकलीस्टसचा समावेश असणार आहे. प्रत्येक संघात 14 वर्षावरील एका सायकलीस्टसचा समावेश अनिवार्य असणार आहे. 10 ते 15 किमीपर्यंतचा मार्ग असणार्या या खेळामध्ये पहिल्या तीन क्रमांक मिळवणार्या संघांना नाशिक सायकलीस्टस तर्फे बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी स्वत:ची सायकल व हेल्मेट अनिवार्य असणार आहेत. शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत स्पर्धेसाठी नोंदणी करता येणार असून +91 7447778844 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.