Breaking News

महा बँकेच्या सातपूर एम.आय.डी.सी शाखेत महिलासांठी स्वतंत्र काऊंटर उघडा

बँक ऑफ महाराष्टˆच्या सातपूर एम.आय.डी.सी.शाखेत महिलासांठी स्वतंत्र काऊंटर उघडावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या सातपूर मंडल महिला आघाडी अध्यक्षा स्मिता जोशी यांनी बँकेचे महा व्यवस्थापक नीलन दुसाने यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.


बँक ऑफ महाराष्टˆच्या सातपूर एम.आय.डी.सी.शाखेत ग्राहकांची सतत गर्दी असते. महिला आणि पुरुषांसाठी एकाच कांऊटरवर उभे राहवे लागते. यांमुळे महिलांची गैरसोय आणि कुचंबणा तर होतेच परंतु त्यांना मोठयाप्रमाणात धक्काबुक्कीलाही सामोरे जावे लागते. 

मला सुध्दा या घटनेचा फटका बसला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. यादृष्टीने या घटनेची गंभीर दखल घेवुन महिला ग्राहकांसाठी स्वतंत्र कांऊटर सुरु करुन महिलांना दिलासा दयावा, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर भाजपा महानगर महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर, अलका पाटील, मनोरमा पाटील, लता बापट, मंगला केल्हे, कुंदा आहेर, शशिकला भांड आदीच्या सहया आहेत.