Breaking News

’दशक्रिया’ चित्रपटाचा येवल्यात निषेध



दशक्रिया या मराठी चित्रपटातील काही दृश्य व संवाद आक्षेपार्ह असून त्यात ब्राह्मण समाज व पुरोहितांची निंदा करण्यात आली आहे. यामुळे समाजाची बदनामी होत असल्याची भावना समाजबांधवांमध्ये निर्माण झालेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्ˆय असले तरी घटनेने कुठल्याही जातीचा व धर्माचा अवमान करण्याचा हक्क कोणालाही प्राप्त होत नाही. 

चित्रपट निर्मात्या कल्पना कोठारे व दिग्दर्शक संदीप पाटील यांनी जाणूनबुजून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे अशी प्रतिक्रिया संपूर्ण समाजातून व्यक्त होत आहे. अश्या निर्मात्या व दिग्दर्शकांवर सामाजिक न्याय व हक्क तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे असे निवेदन प्रांताधिकारी भीमराज दराडे यांना देण्यात आले. 

निवेदनावर परशुराम प्रतिष्ठान व अखिल ब्राह्मण समाज, येवला यांच्या वतीने बाळासाहेब देशमुख, पत्रकार प्रसाद गुब्बी, पुरीहीत संतोष दाणी, विशाल शिखरे, विपुल धुमाळ, स्वाती सावरगावकर, किरण धुमाळ, अक्षय पाठक, निलेश शूळ, अमोल कुलकर्णी, अमित टोणपे आदी समाजबांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.