कर्कटकमध्ये संशोधन, पेटंट मिळवण्याचा प्रयत्न
सोलापूर, दि. 04, नोव्हेंबर - कंपासमध्ये वापरण्यात येणार्या कर्कटकमध्ये मेजरमेंटची सोय, इझी मल्टिपल युजर स्क्रू ड्रायव्हर यात नव्या कल्पना आणून त्याचे पेटंट मिळवण्यासाठी राहुल गायकवाड धडपडत आहे. या संशोधनाचे पेटंट मिळण्याच्या अंतिम टप्प्यातही आहे. असे साहित्य बनवणार्या कंपन्यांना जर असे बदल आपल्या उत्पादनात करायचे असेल तर याचे स्वामित्व राहुलने राखून ठेवले आहेत. संशोधन केवळ थिसिससाठी न करता प्रत्यक्ष उपयुक्ततेवर, संकल्पनेवर अभ्यास करणारा हा वेगळ्या वाटेवरचा शिलेदार.‘युवकांनी प्रचलित शिक्षण तर घेतलेच पाहिजे, त्याचबरोबरच चौकस राहून आवडीच्या विषयात संशोधनही केले पाहिजे. नवे बदल घडवण्यासाठी हे आवश्यक आहे. उगीच उच्च शिक्षण घेऊन छोटी-मोठी नोकरी मिळवण्यात आयुष्य पणाला लागत आहे’, असे राहुलचे मत आहे. तो सध्या बीसीएस शिकतोय, तेही एक्स्टर्नल.कर्कटकच्या दोन्ही टोकांचा वापर करून कोणत्याही रेषेची मायक्रो मिलीमध्ये मोजणी करता येते. मात्र, सध्या ही मोजणी करताना आधी रेषेच्या दोन्ही टोकांपर्यंत कर्कटक ताणले जाते. नंतर ती दोन्ही टोके पट्टीवर ठेवून अंतर मोजले जाते. असे करण्यात वेळ जातो, मोजताना चूक होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे त्या कर्कटकमध्येच मेजरपट्टी बसवण्याची कल्पना राहुलने मांडली. त्या संशोधनाचा शास्त्रीय अहवाल तयार केला व पेटंट मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला.