Breaking News

मार्केट यार्डातील बाजार घटकांच्या संघटना 8 नोव्हेंबरला पाळणार काळा दिवस

पुणे, दि. 04, नोव्हेंबर - केंद्र सरकारने कोणतीही पूर्व तयारी न करता 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याचा व्यापार, उद्योगांवर परिणाम झाला. कष्टकर्‍यांचे आतोनात हाल झाले. आता या निर्णयाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. तरीही अद्याप व्यवहार सुरळीत झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर 8 नोव्हेंबर 2017 हा दिवस मार्केट यार्डातील बाजार घटकांच्या विविध संघटनांच्या वतीने काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे.यामध्ये मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत, पुणे तोलणार संघटना, महात्मा फुले कामगार संघटना आणि टेंम्पो पंचायत या संघटनाच्या सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी याबाबतची घोषणा केली आहे.