Breaking News

चूक पोटात घेऊन काम करण्याची संधी द्यावी - विश्वास-नांगरे पाटील

कामाच्या तणावामुळे पोलिसांकडून चुका होतात. मात्र, कोथळे प्रकरणात पोलिसांकडून झालेली चूक ही गंभीर आहे. आमच्याकडून चूक झाली, ती आम्ही कबूल करतो. चूक पोटात घेऊन काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. 


यावेळी बोलताना नांगरे-पाटील म्हाणाले, पोलिसांना काम करताना दररोज अनेक प्रकारच्या ताणतणावाला सामोरे जावे लागते. पोलीस ठाण्याला कोथळे प्रकरणामध्ये पोलिसांच्या विरुध्द नागरिकांचा ग्रुप तयार झाला. तसेच चांगले काम करताना पोलिसांना सपोर्ट करण्यासाठी नागरिकांचा सपोर्ट  ग्रुप असणे आवश्यक असल्याचे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.

पोलीस आणि नागरिक यांची पोलीस मुख्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नांगरे-पाटील बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे उपस्थित होते.