राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला.
संपूर्ण विदर्भात थंडीची लाट कायम होती. पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानाच्या पाऱ्यात किंचित घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्याच्या अन्य भागांतील थंडीतही लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. .