आयफोन-7 ऑर्डर केला आणि बॉक्समध्ये साबण आला !
प्रिस्टेन इस्टेट सोसायटीमध्ये राहणाऱ्या राजीव जुल्का यांच्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी पत्नीला गिफ्ट देण्यासाठी अमेझॉन या शॉपिंग वेबसाईटवर त्यांनी 44 हजार 900 रुपये किंमत असणारा आयफोन-7 फोन बुक केला होता. बुकिंगवेळी त्यांनी पैसेही भरले होते. दोन दिवसांनंतर त्यांना मेसेज आला की, त्यांच्या फोनची आजच डिलिव्हरी होणार आहे. मेसेजमध्ये डिलिव्हरी बॉयचा मोबाईल नंबरही आला .
राजीव यांनी बॉक्स उघडल्यावर त्यांना झटकाच बसला. त्यात फोनऐवजी रिन साबणाची वडी होती, तर चार्जर, इयर फोन, फोन कव्हर आणि इतर वस्तू मात्र व्यवस्थित होत्या. राजीव यांनी तातडीने सुरक्षारक्षकाच्या मदतीने डिलिव्हरी बॉयला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.