जवान सुभाष कराडे स्फोटात शहीद
लोणंद, दि. 6 (प्रतिनिधी) : अरुणाचल प्रदेश येथे शुक्रवारी तंबूचा स्फोट होऊन भाजल्यामुळे भारतीय सैन्य दलातील हवालदार व खंडाळा तालुक्यातील कराडवाडीचे सुपुत्र सुभाष लालासो कराडे शहीद झाले. सुभाष कराडे यांनी 15 वर्षांची सैन्यात सेवा बजावल्यानंतर त्यांना दोन वर्षे मुदतवाढ घेतली होती. त्यांना वीरमरण आल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
सुभाष कराडे अरुणाचल प्रदेश येथील टेंगा भागात 120 इंजिनिअरिंग रेजीमेंट ब्रिगेड 46 मध्ये हवालदार पदावर देशाची सेवा बजावत होते. शहीद जवान सुभाष कराडे यांच्या पश्चात वडील लालासो, आई छबूबाई, पत्नी मनीषा ऊर्फ पूनम, मुलगी सुप्रिया (वय 10), मुलगा सनी (वय 5), पारगाव आगारात वाहक असणारे भाऊ संजय असा परिवार आहे.
गरीब कुटुंबातील सुभाष कराडे यांचे शालेय शिक्षण कराडवाडी व अंदोरीत झाले. लोणंदच्या मालोजीराजे कॉलेजात 12 वीत असताना वयाच्या 17 व्या वर्षी 2001 मध्ये ते सैन्यात भरती झाले. खंडाळा तालुक्यातून सैन्यदलात इतक्या कमी वयात भरती होणारे व कराडवाडीतील ते पहिलेच जवान होते. अरुणाचल प्रदेश येथील टेंगा भागात जवान सुभाष कराडे कार्यरत होते. तो भाग दाट जंगल, बर्फाळ व उंच डोंगरांचा होता. रात्री जेवण झाल्यानंतर थंडीमध्ये ऊब मिळण्यासाठी असलेल्या बुखारीचा अचानक स्फोट झाल्याने तंबूने पेट घेतला. यामध्ये सुभाष कराडे गंभीर जखमी झाले होते.