Breaking News

श्रमसंस्कार शिबिराची दि. ३० रोजी सांगता.

श्रीरामपूर: प्रतिनिधी - अशोकनगर येथील अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने दत्तकग्राम शिरसगाव येथे दि. २३ पासून आयोजित करण्यात आलेल्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप येत्या दि. ३० रोजी होणार आहे. 


एका शिबिरात अक्षय उर्जा वापर जनजागृती, गटारे शोषखड्डे बांधकाम, प्रबोधन, पथनाट्ये, वृक्षारोपण, संवर्धन, युवा सबलीकरण, इतिहास लेखन पाणी बचत जनजागृती व्यक्तिमत्व विकास आदी विविध उपक्रम रावबविण्यात आले. शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी मोहन जाधव, मुळा प्रवरा इले.को.ऑप.सोसायटीचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे हे राहणार आहेत. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सोपानराव राउत, उपाध्यक्ष दिगंबर शिंदे, भाऊसाहेब उंडे, आबासाहेब गवारे, भास्कर खंडागळे, समन्वयक मंजुश्री मुरकुटे, गणेशराव मुद्गुले आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य समीर सय्यद, उपप्राचार्या सुनीता गायकवाड, प्रा. सोमनाथ आरंगळे, प्रा. शेख हीना आदींनी केले आहे.