Breaking News

शिरसगावची कन्या झाली मुसळवाडीची सरपंच

श्रीरामपूर: प्रतिनिधी - तालुक्यातील शिरसगावची कन्या आणि लक्ष्मणराव यादव यांच्या भगिनी पद्मा धुमाळ यांची मुसळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली. या निवडीबद्दल शिरसगाव ग्रामस्थांच्यावतीने येथील सरपंच सुनंदा जाधव, मीना मुद्गुले यांच्या हस्ते सत्कार सरपंच धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला. 


यावेळी उपसरपंच दीपक जाधव, माजी प. स. सदस्य गणेशराव मुद्गुले, बाळासाहेब बकाल, लक्ष्मणराव यादव, दत्ता जाधव, पाराजी ताके, प्रल्हाद भाग्यवंत, रमेश यादव, निलेश यादव, मधुकर गवारे, राजेश यादव, विश्वनाथ दाभाडे, राजू यादव आदी उपस्थित होते. दरम्यान, ‘अशोक’चे संचालक आबासाहेब गवारे, नगरसेविका शीतल गवारे यांच्या हस्ते धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोरख गवारे, बबनराव गवारे, प्रकाश गवारे, सचिन गवारे, प्रवीण गवारे आदी उपस्थित होते.