Breaking News

कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयात पर्यावरण पोषक प्रकल्प सादर


कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पोषक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात केले. नैसर्गिक साधनसंपत्तीतून नूतनीकरणक्षम उर्जा स्त्रोतांचे प्रतिकृती व भित्तीपत्रिकांच्या साहाय्याने उकरण्यात आलेल्या या सादरीकरणात जलविद्युत, सौर, फोटोव्होल्टेइक, सौर औष्णिक विद्युत, जैवइंधन, बायोगॅस, पवन, भरती संबंधीचा आणि लहर शक्ती, भूऔष्णिक, परमाणु अशा एकूण दहा विषयांवरील ऊर्जा प्रकल्प तयार करण्यात तयार करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.